नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
कृषी विभाग महाराष्ट्र शासन
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प - फळबाग लागवड / वृक्षलागवड
Nanaji Deshmukh Krushi Sanjeevani Prakalpa - Orchard Plantation / Tree Plantation
आवश्यक कागदपत्रे
1) अर्जदाराचा ७/१२ व ८ अ उतारा
2) अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
3) अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
4) जमीन आरोग्य पत्रिका
5) संयुक्तपणे खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र (फळबाग लागवडीसाठी लागू)
6) जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास कुळाचे संमतीपत्र (फळबाग लागवडीसाठी लागू)
पात्रता निकष
* प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प, अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु.जाती/ जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
* प्रकल्पांतर्गत सदर घटकाचा लाभ ५ हेक्टर पर्यंत जमीनधारणा असलेल्या लाभार्थींना देय राहील.
* प्रकल्पांतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ देण्यात यावा, संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ अनुज्ञेय राहणार नाही.(फळबाग लागवडीकरिता लागू)
* शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावे 7/12 उतारा असणे आवश्यक आहे तथापि, जर लाभार्थी ७/१२ उताऱ्यावर संयुक्तपणे खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र बंधनकारक राहील. (फळबाग लागवडीकरिता लागू)
* लागवड करावयाच्या फळपिकासाठी ठिबक सिंचन संचाची उभारणी करण्याकरिता लाभार्थ्याकडे पाणी पुरवठ्याचा स्त्रोत व आवश्यक सुविधा असावी. (फळबाग लागवडीकरिता लागू)
* जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास, 7/12 च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक राहील. (फळबाग लागवडीकरिता लागू)
* या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या मालकीची किमान २० गुंठे शेत जमीन असणे बंधनकारक राहील. (फळबाग लागवडीकरिता लागू)
* ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेल्या सार्वजनिक (ग्रामपंचायत व इतर शासकीय) क्षेत्रावर वृक्ष लागवड करता येईल.
* या घटकाकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत पुन्हा लाभ मिळणार नाही.
***
हे सुद्धा पाहा