काय आहे Maha-DBT शेतकरी जाणून घ्या नोंदणी अर्ज योजना सर्व काही

0

काय आहे Maha-DBT शेतकरी जाणून घ्या, नोंदणी अर्ज योजना सर्व काही.



Know What is Maha-DBT Farmers, Registration Application Scheme Everything.


Maha-DBT हा एक महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्या परियंत Direct Benifits Transfer मंजेच की शेतकऱ्याला डायरेक्ट कोंन त्या पन योजनेचा लाभ घेता यावा यासाठी व तियाच्या परियांत सर्व शासनाच्या योजना पोहोचाव्या या उद्देशाने Maha-DBT या पोर्टल चि सुरुवात झाली.


Maha-DBT Farmer's पोर्टल काय आहे

ही एक महाराष्ट्र शासनाने तयार केलेली एक साईट आहे जियावर शेतकरी आपले एक आयडी बनऊन शेतकऱ्या साठीच्या शासनाच्या वेग वेगळ्या योजनांसाठी डायरेक्ट अर्ज करू शकतो व तिया सर्व योजनांचा लाभ घेऊ शकतो हेच आहे Maha-DBT Farmer's पोर्टल

Official Website
👇👇👇



Maha-DBT FARMER'S मध्ये कोण कोणत्या योजना येतात योजनांची यादी


Maha-DBT FARMER'S मधुन तुम्ही पुढील योजनांचा लाभ घेऊ शकता


1) राज्य सरकारची डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
  • नवीन विहिर बांधण्यासाठी– रु. २,५०,००० (अडीच लाख )
  • जुनी विहीर दुरुस्ती– रु. ५०,००० (पन्नास हजार)
  • इनवेल बोअरींग– रु. २०,००० (वीस हजार )
  • पंप संच– रु. २०,००० (वीस हजार )
  • वीज जोडणी– रु. १०,००० (दहा हजार )
  • शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण– रु. १,००,००० (एक लाख)
  • सुक्ष्म सिंचन संच– ठिबक सिंचन ५०,०००(पन्नास हजार) किंव्हा तुषार सिंचन २५,००० (पंचवीस हजार)
  • पीव्हीसी पाईप– रु. ३०,००० (तीस हजार)
  • परसबाग– रु. ५०० (पाचशे )

2) राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान कोरडवाहू क्षेत्र विकास,

3) भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना,

4) अर्ज भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड शेतकरी अनुदान योजना,

5) अर्ज बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना,

6) राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना २०२२ Online अर्ज ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र

7) १५० कोटी कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प योजना निधी मंजूर (रफ्तारअंतर्गत) सप्टेंबर २०२१

8) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

9) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका अनुदान योजना

10) महाडीबीटी बियाणे वितरण अनुदान योजना २०२२ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान

शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा समावेश या येजनांमध्ये केला गेला आहे

उदारनारर्थ :-

सिंचन योजना मार्फत
विहीर/ मोटार पंप/ पाईप्स/ तुषार सिंचनाची साधने/ इत्यादी
शेतीसाठी लागणारे कुंपण तलाव विहिरीचे दुरुस्थिकरण सोलार इत्यादी,

पात्रता

*शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे

*शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा

*शेतकरी अनु. जाती, अनु. जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक

*फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र / अवजार

*कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक

*एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल

उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील

आवश्यक कागदपत्रे

*आधार कार्ड

*७/१२ उतारा

*८ अ दाखला

*खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल

*जातीचा दाखला (अनु. जाती व अनु. जमाती साठी)

*स्वयं घोषणापत्र

*पूर्व सम्मतीपत्र

या तर झाल्या योजना परंतु या योजनांचा लाभ कसा घ्यायचा जाणून घ्या 

आपले सरकार Maha-DBT Farmer's वर नोंदणी कशी करायची कोण कोणती कागपत्रे लागतील जाणुन घ्या



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(𝐂𝐨𝐧𝐭𝐢𝐧𝐮𝐞 !) #days=(1)

𝐖𝐞𝐥𝐜𝐨𝐦𝐞 𝐭𝐨 "माझा रोजगार" 𝐹𝒶𝓂𝒾𝓁𝓎 आमच्या सोबत सामील होण्यासाठी आपले धन्यवाद 🤗
Accept !
To Top